नंद गोपाल दूध

PURE FRESH MILK
🥛 १००% नैसर्गिक / 100% Natural

ताजं दूध. शुद्ध दूध. आपल्या घरापर्यंत.

चाकूर आणि परिसरात घरपोच दूध सेवा.

संस्थापकांकडून...

ऋषिकेश राठी

"शेती आणि पशुपालनाशी माझं नातं लहानपणापासूनच आहे. आमच्या घरी गायी-म्हशी असल्यामुळे शुद्ध आणि ताज्या दुधाची सवय होती. पण प्रत्येक कुटुंबाला असंच दर्जेदार दूध मिळावं, या विचारातून या उपक्रमाची सुरुवात केली.

आज चाकूर आणि परिसरातील अनेक कुटुंबांपर्यंत दूध पोहोचवताना मनापासून आनंद होतो. हा प्रवास अजून छोट्या प्रमाणावर असला, तरी दुधाची गुणवत्ता, शुद्धता आणि कोणत्याही प्रकारची भेसळ न करणे याबाबत आम्ही कधीही तडजोड करणार नाही.

आपला विश्वास हीच आमची खरी प्रेरणा."

— ऋषिकेश राठी संस्थापक, नंद गोपाल दूध

आमची उत्पादने

ताजे ५०० मि.ली. शुद्ध दूध पाकीट

नंद गोपाल ५०० मि.ली. दूध पाकीट
500 ml अर्धा लिटर ताजे दूध पाकीट

ताजे आणि पौष्टिक दूध रोज सकाळी व संध्याकाळी थेट घरपोच.